Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

55,000 शिक्षक भरती बेमुदत राज्यव्यापी महाआंदोलनाच्या मार्गावर अभियोग्यताधारक, मागणी पुर्ण होईपर्यंत समृध्दी महामार्ग अडविण्याचा इशारा

55,000 शिक्षक भरती बेमुदत राज्यव्यापी महाआंदोलनाच्या मार्गावर अभियोग्यताधारक, मागणी पुर्ण होईपर्यंत समृध्दी महामार्ग अडविण्याचा इशारा

असे एक वाक्य आहे की, " जेव्हा आपण प्रयत्न करुन हरत असतो तेव्हा आपण हरूनही जिंकलेले असतो. पण जिथे आपण प्रयत्नच करत नाही तिथे आपण आधीच हरलेले असतो". आणि शेवटी हिंदीत असे म्हंटले जाते, " सत्य परेशान हो सकता है, पराजित नही". 

ह्या सर्व बाबी भावी शिक्षकांना, शिक्षक होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या प्रत्येक अभियोग्यता धारकांना ठाऊक आहेत. पण आधीच शिक्षक भरतीची वाट पाहू, पाहू थकलेला, कोणाचे वय एजबार होऊन चालले तर कोणाचे आई वडील मुलांच्या शिक्षक होण्याच्या अपूर्ण स्वप्नातच अजूनही प्रतीक्षेत आहेत.  अशा अनेक व्यथा आहेत ज्या केवळ आणि केवळ शिक्षक होऊ पहाणाऱ्या पोरांना अनेक वर्षांपासून सोसावे लागत आहे.

नुकताच अभियोग्यता धारकांनी शिक्षण आयुक्तालय, पुणे येथे ५५,००० शिक्षक भरती संदर्भात आंदोलन सुरू केला. वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या उपाशी बसलेल्या, काही माझ्या ताईंनी आपल्या पोरांना सोबत घेऊन तिथे आहेत फक्त आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्या म्हणून. शासनाने जी पात्रता ठरवून दिली, जे शैक्षिणक योग्यता दिली ती पूर्ण करून, सोबतच शिक्षक होण्याची जी परीक्षा आहे ती देऊन आज त्याच जागेसाठी रस्त्यावर बसून आपला हक्क मागत आहेत. तेव्हा त्यांना सांगितले जाते की, तुम्ही इथे का बसलात ? काय साध्य होणार? तुम्ही इतके दिवस दहा, दहा वर्ष काहीच केले नाही का ? तुम्हाला फक्त शिक्षकच व्हायचे आहे का ? तुमच्यापैकी सर्व जण नाही लागणार आहेत. मग तुम्हाला प्लॅन B तयार करायला हवा ?  जेव्हा आमचा विदयार्थी विचारतो की, सर भरती केव्हा होईल ? पोर्टल केव्हा सुरू होईल तर, उत्तर दिले जाते. माहीत नाही मला. इतकेच नाही तर ,जेव्हा आमचा अभियोग्यता धारक विचारतो, सर बिहार राज्यात दीड लाखाच्या वर शिक्षक भरती होऊ शकते तर, महान अशा आपल्या राज्यात ५५,००० का नाही ? तर उत्तर दिले जाते, तुम्ही मग बिहार ला जाऊन भरती द्या. 

अशा उत्तराने माझा हा अभियोग्यता धारक अजूनही खचला नाही. कारण त्याला शिक्षकच व्हायचेय. काय आहे प्लॅन B ? जेव्हा लागलेल्या जागेवर त्याला नियुक्ती मिळत नाही. ज्या भरतीत तो पास होऊन बसला आहे आणि त्याला परत प्लॅन B सांगतात. हे कुठले शहाणपण ? तो इथपर्यंत प्रवास करत आलाय तो आतापर्यंत प्लॅन B मधेच होता, पण त्याचा प्लॅन A हा शिक्षक बनणे हाच होता. आणि प्लॅन B जो तो करत होता तो प्लॅन A साठीच होता. तुमच्या मते प्लॅन B जर शिक्षक भरती सोडून दुसरी भरती द्या असा असेल तर, मग passion, आवड याला काही अर्थच नाही. आणि दुसऱ्या परीक्षा सर्वांनाच जमतात का ? त्यातही वेगवेगळ्या पात्रता असतात मग परत त्या आम्ही पूर्ण करायच्या का ? आणि ही शिक्षक साठीची घेतलेले शिक्षण कोणत्या कामाचे?

तुम्ही आम्हाला म्हणता दहा दहा वर्षे काय केली ? तुम्ही मग झोपा काढलीत काय दहा दहा वर्षे भरती न घेता. आम्हाला माहीत असते की दर सात आठ वर्षांनी शिक्षक भरती होते तर मग कशाला इतके पोरं या भरतीचे स्वप्न उराशी बाळगले असते. 

या शिक्षक भरतीने शासनावर पैशाचा ओझं होईल, खूप खर्च वाढेल त्यामुळे इतकी भरती शक्य नाही. मग कशावर शक्य आहे ? नेते मंडळीच्या पेन्शन वर ? की , त्यांच्या दुसऱ्यांदा निवडून आलेल्या दुसऱ्या पेन्शन वर. मुलांच्या शिक्षण अधिकारात आहे की, त्यांना योग्य प्रमाणात शिक्षक मिळाले पाहिजेत, मग त्यांना शिकाकांची गरज आहे. खूप ठिकाणी शिक्षकच नाहीत , काही ठिकाणी एक शिक्षक दोन, दोन, तीन,तीन वर्ग सांभाळतोय आणि सांगितले जाते की, हळूहळू भरती करू. ते शिक्षक दर महिन्याला रिटायर होऊ लागलेत, आधीच शिक्षकांची कमतरता आहे. मग घ्यायला काय हरकत आहे ? 

म्हणतात की, ३०,००० शिक्षकांची भरती झाली आहे, साहेब कुठे झाली आहे हो ? कुठे आहेत ते ३०,००० शिक्षक ? आमच्यातले आजही त्या पुण्यात उन्हातान्हात बसून बोंबलत आहेत. मग तुमचे ३०,००० शिक्षक कोणते आहे ? 

तुम्ही आम्हाला सांगितले असते की, २००० जागा आहेत आणि आम्हाला कळले असते की, आम्हाला  त्यापैकी २०,३० जागा येतील तर आम्ही नसतो लागलो मागे, परीक्षा देऊन विसरून गेलो असतो. पण जागा न सांगता तात्काळ परीक्षा घेतली जाते. तीही अशी परीक्षा जिचा अभ्यासक्रम एक न पेपर दुसराच . उद्या अशीच Collector च्या Exam ला CA चा पेपर देऊन द्या. आणि UPSC देणाऱ्या पोरांना म्हणा दिल्लीत दहा वर्षे का झोपला होता काय म्हणून? 

आम्ही काय मागतोय ? आम्ही तर हेच मागतोय की, तुम्ही घेतलेल्या परीक्षा आम्ही दिल्या त्या जागेवर आमच्या पोरांना घ्या. जे पोरं शाळेला शिक्षक द्या म्हणून स्वतः ZP च्या दालनात बसतो त्याला शिक्षक द्या. जो गरीब बाप आपल्या पोराला गावीच चांगले शिक्षण व त्यासाठी लागणारा शिक्षक भेटावा म्हणून शाळेला नाईलाजाणे कुलूप ठोकतोय त्यांना शिक्षक मागतोय, हे सर्व मागताना यासाठी आम्ही निवेदने देतोय, यात कितपत आमची चूक आहे हे तुम्ही आम्हाला सांगा ? 

टप्पा, टप्प्यात भरती घेणार असल्याचे सांगितले जाते का ? २०१७ चा वर गेलेला टप्पा अजून पडलाच नाही . आता किती टप्पे खेळाल? आता परत २०२३ चे टप्पे झाले तर २०३० मधे हा टप्पा पडेल. मग काय स्थिती होईल या शाळेची ? तोपर्यंत आमच्या मुलांनी काय करायचं प्लॅन B करून भजे तळायचे का ? सर्व मुले आता तेच करू, ज्या ज्या परीक्षा येतील तेथे फॉर्म भरू, मात्र Vacancies नाही मिळाल्या की, आणखी दुसरा प्लॅन करू, मग आणखी तिसऱ्या गोष्टीचा प्लॅन करू.

आम्हाला आता एवढच कळले आहे की, ८०% शिक्षक भरतीची परवानगी आहे. ५५,००० शिक्षक भरती हवी आहे. तेही एका टप्प्यात. सर्व परीक्षा दिलेल्या अभितोग्यता धारकांनी निर्धार केला आहे की, आता ५५,००० शिक्षक भरती झालीच पाहिजे. आणि हे मिळविण्यासाठी आज आमच्या अभितोग्यता धारकांना एका मोठ्या राज्यव्यापी आंदोलना शिवाय दुसरा पर्यायच उरलेला नाही. यासाठी शिक्षव्यवस्थेतील तळमळ असलेले स्वतः शिक्षक असून देखील यामधे सहभागी होणारे. अनेक संघटना आपसी वाद मिटवून एकत्र होऊ पाहत आहेत, माझी शिक्षक पदी वर्णी होवो की, नको मी माझ्या बांधवांसाठी येईन असे म्हणणारे, मी शिक्षक भरती मधे नसलो तरी दुसऱ्या बाबतीत असे नको व्हायला म्हणणारे, आपला मुलगा लागावा म्हणून बाप सोबत येतोय आणि आपली आई शिक्षक व्हावी म्हणून तिचा बाळ सुध्दा आज बॅनर घेऊन उभा होण्यास तयार होतोय, कारण सर्वांचा आता एकच ध्येय आहे तो म्हणजे ५५,००० शिक्षक भरती आणि एकाच टप्प्यात.आणि इथे त्या प्रतेकानेच यायला हवे जो स्पर्धा परीक्षा देतोय, इथे त्या प्रत्येकाने यायला हवे जो मित्र नेहमी विचारत असतो लागला काय शिक्षक म्हणून. त्या नातेवाईकाने यावे जो प्रत्येक वेळी कुठेतरी लागल्याच्या प्रश्नाने टॉर्चर करतो.

आज या आंदोलनाची दखल शासनाला , प्रशासनाला घ्यावीच लागेल कारण, ही मागणी हवेत गोळीबार नसून रास्त मागणी आहे. आणि ही पूर्ण झाल्याशिवाय हा आंदोलन संपणार नाही. आणि ह्या आंदोलनाची तीव्रता इतकी असेल की, संपूर्ण देशात याची हाक ऐकू येईल. वेळ पडल्यास समृध्दी महामार्ग अडविण्याचा इशारा सुध्दा आमच्या अभियोग्यता धराकांकडून  करण्यात आला आहे आणि या परिस्थितीस मग कोण जबबदार राहील ? 

आज जो आंदोलन होईल त्याचे यश काहीही असो त्याचे फलित काहीही असो मात्र हे सर्व पाहतांना पुढची पिढी थोडीशी तरी जागी होईल ? ह्या लढ्याचे चित्र पाहून त्यांच्यातही लढण्याचे सामर्थ्य निर्माण झाले तरी, अभियोग्यता धारक जिंकलेला असेल. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या